Bhupesh Baghel: भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत दिवाळीच्या दिवसांत विविध प्रथा-परंपरांचं पालन केलं जातं. छत्तीसगडमध्ये गौरा-गौरी पूजेच्या दिवशी दुसऱ्याच्या हातानं चाबकाचे फटके मारून घेण्याची परंपरा आहे. तसं केल्यानं वाईट गोष्टी आपल्यापासून दूर जातात व जीवनात समृद्धी येते, अशी लोकमान्यता आहे. राज्याच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्री दरवर्षी या पारंपरिक कार्यक्रमात सहभागी होतात. भूपेश बघेल यांनी दरवर्षीप्रमाणे यंदा यात भाग घेतला व स्वत:च्या हातावर चाबकाचे फटके मारून घेतले.