Chhagan Bhujbal Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून त्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांना धमकी येणं ही काळजीची बाब आहे. कारण यापूर्वी नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांसारख्या विचारवंत आणि कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत. त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारनं यामागचे ब्रेन कोण आहेत हे शोधून काढावेत, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.