Video : त्या दिवशी बारामतीहून फोन गेला आणि…; छगन भुजबळ यांनी नेमकं काय सांगितलं?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : त्या दिवशी बारामतीहून फोन गेला आणि…; छगन भुजबळ यांनी नेमकं काय सांगितलं?

Video : त्या दिवशी बारामतीहून फोन गेला आणि…; छगन भुजबळ यांनी नेमकं काय सांगितलं?

Published Jul 15, 2024 01:08 PM IST

Chhagan Bhujbal Video : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या जनसन्मान रॅलीचा शुभारंभ १४ जुलै रोजी बारामतीमधून झाला. यावेळी छगन भुजबळ यांचंही भाषण झालं. राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षण वादावरून भुजबळ यांनी विरोधकांवर जोरदार तोफ डागली. सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याबद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. 'आम्ही सगळ्यांना आमंत्रण पाठवलं होतं. कायद्याच्या प्रती दिल्या होत्या. जमल्यास शरद पवारांना घेऊन या असंही सांगितलं होतं. विरोधी पक्षाचे नेते येणार असंही कळलं होतं. मात्र, त्या दिवशी संध्याकाळी बारामतीहून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला, असा दावा भुजबळ यांनी केला. शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाची नेटानं अंमलबजावणी केल्याबद्दल आम्ही याआधीही त्यांचे आभार मानले आहेत. आजच्या परिस्थितीत त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे, असंही भुजबळ म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp