मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे लोक म्हणजे दरोडे घालणारे डाकू; भाजपचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे लोक म्हणजे दरोडे घालणारे डाकू; भाजपचा हल्लाबोल

24 January 2023, 18:52 IST Ganesh Pandurang Kadam
24 January 2023, 18:52 IST

Ashish Shelar attacks Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे मुंबई महापालिकेवर दरोडा टाकणारे डाकू आहेत. या डाकूंपासून मुंबईला मुक्त करणं हे भारतीय जनता पक्षाचं मिशन आहे, अशी जहरी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेनेनं काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीकेची तोफ डागली होती. त्यांच्या या टीकेचा शेलार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

Readmore