Supriya Sule Speech Video : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषण सुरू करतानाच सभागृहात उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. जय श्रीराम, भारतीय जनता पक्षाचा विजय असो... अशा घोषणा सुरू झाल्या. भाजपच्या नेत्यांनी हात दाखवूनही त्या थांबत नसल्यानं सुप्रिया सुळे बोलायचं थांबल्या व त्यांनीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोलू का अशी विचारणा केली. भाषण संपल्यावर मात्र त्या रामकृष्ण हरी बोलायला विसरल्या नाहीत.