Namo Express video : महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांना वर्षभर ज्याची आस लागलेली असते, त्या विठुरायाच्या भेटीचा क्षण आला आहे. उद्या, १७ जुलै रोजी आषाढी एकादशीची यात्रा आहे. त्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. मिळेल त्या वाहनानं लोक पंढरीच्या मार्गानं निघाले आहेत. मुंबईतील वारकरीही यास अपवाद नाहीत. या वारकऱ्यांची सोय म्हणून भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा व आशिष शेलार यांच्या प्रयत्नानं खास पंढरपूरसाठी नमो एक्सप्रेस सोडण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी त्यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं.