Biporjoy in Gujarat Video : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं असून त्याचा मोठा फटका किनारपट्टीच्या भागाला बसला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली आहेत. द्वारका जिल्ह्यातील रुपेन बंदर परिसरातील सकल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफचे जवान मदतकार्यात गुंतले असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. मांडवी, जामनगर या शहरांनाही वादळाचा जोरदार फटका बसला आहे.