लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा सुरू आहे. बिहारचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी नुकतीच खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी भोजपुरी भाषेतून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीचा उल्लेख केला. तसंच काही घोषणाही दिल्या. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं ते भडकले. त्यांनी खासदारांना सुनावले. मी सहा वेळा खासदार झालोय. तुमच्यासारखा दुसऱ्याच्या कृपेवर निवडून येत नाही. मला शिकवू नका, असं त्यांनी सुनावलं.