Video : ह्या लोकांना संविधानाचाच एन्काऊंटर करायचाय; ओवेसींचा भाजप सरकारवर हल्लाबोल
Asaduddin Owaisi on Prayagraj Shootout : उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आतिक अहमद याचा गुन्हेगार मुलगा असद अहमद हा आज पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. पोलिसांच्या या कारवाईवर असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुस्लिम समाजातील तरुणाचे खून करणाऱ्यांनाही अशीच शिक्षा यूपी सरकार देईल का? हे लोक तसं करणार नाहीत. कारण ते केवळ धर्माच्या आधारावर एन्काऊंटर करतात, असा आरोप ओवेसी यांनी केला. कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. ह्यांना संविधानाचाच एन्काऊंटर करायचा आहे. त्यांना कायद्याचं राज्य उलथवून टाकायचं आहे. तुम्हीच गोळ्या घालून न्याय देणार असाल तर न्यायालय, सीआरपीसी, आयपीसी, जज, सरकारी वकील कशासाठी आहेत. तुम्हालाच सगळे निर्णय घ्यायचे असतील तर बंद करा न्यायालयं, असा संताप ओवेसी यांनी व्यक्त केला.