मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : मोदींनी सगळं बरबाद केलं; जमीन, आकाश, पाताळही विकलं!

Video : मोदींनी सगळं बरबाद केलं; जमीन, आकाश, पाताळही विकलं!

Jul 19, 2023 12:16 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jul 19, 2023 12:16 PM IST

Arvind Kejriwal Bengaluru speech Video :  केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज बेंगळुरू इथं पार पडली. बैठकीनंतर प्रमुख नेत्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. सध्या केंद्राच्या विरोधात न्यायालयीन आणि राजकीय अशी दुहेरी लढाई लढणारे आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशातील जनतेनं ९ वर्षांपूर्वी भाजपला पूर्ण बहुमतानं निवडून दिलं होतं. या काळात देशासाठी बरंच काही करण्याची त्यांच्याकडं संधी होती. मात्र, मोदींना काहीच करता आलं नाही. देशातील प्रत्येक क्षेत्र त्यांनी बरबाद करून टाकलं. रेल्वे, विमान, जहाजं, विमानतळं, जमीन, आकाश, पाताळ सगळं विकून टाकलं, असा घणाघात केजरीवाल यांनी केला.

More