Ajit Pawar video : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणं काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरून परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचं व प्रार्थना स्थळांचं नुकसान केलं. या नुकसानग्रस्त गावाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली व पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. नुकसान झालेल्या गावाचा विशाळगडावरील अतिक्रमणाशी संबंध नव्हता, असं अजित पवार म्हणाले. या गावात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनानं शासनाकडं प्रस्ताव पाठविला आहे. सर्वांना तातडीची मदतही शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विशाळगड अतिक्रमणाच्या बाबतीत नियमांच्या बाहेर जाऊन कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.