Ajit Pawar Speech in Baramati Video : राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून या पक्षावर ताबा मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घातला. या मेळाव्यातून त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार देण्याची घोषणाच त्यांनी अप्रत्यक्ष केली. बारामतीमधून आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून गेला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांच्यावर टीकाही केली.