Ajit Pawar Shayari Video : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात आणि शेवट अभंगवाणीनं केला. तर, भाषणाच्या मध्ये त्यांनी दोन शेर ऐकवले. त्यांच्या या शेरोशायरीला सत्ताधारी बाकांवरून जोरदार प्रतिसाद मिळाला.