Vijay Wadettiwar Taunt Ajit Pawar : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली आहे. वाल्मिक कराड हा सरकारमधील सध्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू आहे. त्यामुळं त्यांचे नेते अजित पवारही अडचणीत आले आहेत. मात्र ते यावर कोणतंही भाष्य करत नसल्याचा धागा पकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 'अजितदादांच्या पक्षात सध्या छगन भुजबळ नाराज आहेत. वाल्मिक कराडच्या निमित्तानं धनंजय मुंडे यांना पत्ता कापून छगन भुजबळांना संधी देण्याचा अजित पवारांचा विचार नाही ना, अशी शंका वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे.