मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : मस्त बातमी! मुंबई, ठाणे व नवी मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार!

video : मस्त बातमी! मुंबई, ठाणे व नवी मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार!

Jun 28, 2024 05:59 PM IST

Ajit Pawar on Petrol Diesel Tax : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. यात शेतकरी, महिला व विविध समाज घटकांसाठीच्या योजनांचा समावेश आहे. राज्यातील पेट्रोल, डिझेलवर असलेल्या मूल्यवर्धित करात समानता यावी या उद्देशानं राज्य सरकारनं मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील पेट्रोल व डिझेलवरील करात कपात केली आहे. त्यामुळं या तिन्ही शहरांमध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp