ajit pawar on mahji ladki bahin Yojana : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लक्षवेधी ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसंच, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.