Aditya Thackeray Video : मुंबई महापालिकेचा तब्बल ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. 'मुंबईची अवस्था म्हणजे हजार गम है, खुलासा कौन करे, अब तो मुस्कुरा लेता हूं तमाशा कौन करे. म्हणजे मुंबईकर सहन करत राहतात. मुंबईकर सहन करत राहतात. सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत. ठिकठिकाणी बेस्टच्या बसेस बंद झाल्या आहेत. पाणी दुषित येतं, रस्ते कुठेही वळवलेले आहेत. मुंबईत धुळीचं साम्राज्य पसरलेलं असून नाका तोंडात धूळ जाते. पण तसे पाहिल्यास कुठल्याही सरकारकडून विशेषतः भाजपकडून काही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. आणि भाजपकडून मुंबईची वेगळ्याच प्रकारची पिळवणूक सुरू आहे, अशी टीका आदित्य यांनी केली. आता धारावीतील दुकानं व झोपड्यांवर अदानी कर लावण्याचा डाव सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.