Aaditya Thackeray BMC Morcha Speech Video : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं १ जुलै रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात शिंदे गट व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. रस्ते घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचा पाढा त्यांनी यावेळी वाचला. आम्ही तुमच्या फाइल बनवल्या आहेत. आमचं सरकार आलं की पोलिसांसोबत आम्ही आत येणार आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.