Maharashtra Assembly Election : अकोले विधानसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी सभा घेतली. यावेळी सयाजी शिंदे यांनी आपल्या खास शैलीत जोरदार फटकेबाजी केली. आघाड्या बिघाड्या खूप आहेत, पण खरी आघाडी ही घडी (घड्याळ) आहे, असं सयाजी शिंदे म्हणाले. यावेळी सयाजी शिंदे यांनी तेलुगु सिनेमातील एक डायलॉग बोलून किरण लहामटे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.