दिल्ली सरकारमधील कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. अटकेची कारवाई आणि वेळ चुकीची होती, अशी टिप्पणीही न्यायालयानं जामीन देताना केली आहे. तसंच, सीबीआयला फटकारलं आहे. केजरीवाल यांच्या जामिनाची बातमी मिळताच आम आदमी पक्षात चैतन्य संचारलं आहे. सुनीता केजरीवाल यांच्यासह सरकारमधील मंत्री दिल्लीच्या रस्त्यावर उतरून मिठाई वाटत आहेत.