मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : वकिलांना भेटू दिलं नाही तर अरविंद केजरीवाल खटला कसे लढणार?; संजय सिंह यांचा सवाल

Video : वकिलांना भेटू दिलं नाही तर अरविंद केजरीवाल खटला कसे लढणार?; संजय सिंह यांचा सवाल

Apr 10, 2024 05:16 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 10, 2024 05:16 PM IST

Sanjay Singh Press Conference Video : तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक प्रकारची बंधनं घातली जात आहेत. त्यांना वकिलांनाही भेटण्यापासून रोखलं जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. 'आप'चे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'तुरुंगात असताना एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाची आणि आपल्या वृद्ध आई-वडिलांची विचारपूस करू शकत नाही. हे कुठल्या नियमात लिहिलंय? अरविंद केजरीवाल यांना वकिलांना भेटू दिलं जात नाही. वकिलांना भेटले नाहीतर तर ते खटला कसा लढवणार?, असा सवाल संजय सिंह यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांना कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली जातेय? दिल्लीकर जनतेला मोफत वीज, मोफत पाणी, उत्तम शाळा आणि आरोग्य व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. हा त्यांचा गुन्हा आहे का?, असा सवाल संजय सिंह यांनी केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp