Maharashtra Vidhan Sabha Election : महाविकास आघाडीचे नाशिक शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर ह्यांच्या प्रचारासाठी युवासेनाप्रमुख, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे हे स्टेज सोडून थेट लोकांमध्ये गेले आणि भाषण केलं. त्यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर उपरोधिक टीका केली. २०१४ साली भाजपवाले १५ लाख रुपये देणार होते, ते आता १५०० रुपये देतायत. उद्या हे पुन्हा आले तर हे १५०० रुपये दीडशे रुपये होतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला.