Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Granth Dindi Video वर्धा इथं आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. संमेलनाच्या सुरुवातीला प्रथेप्रमाणे ग्रंथ दिंडी काढण्यात आली. साहित्यिकांबरोबरच शाळकरी मुलांसह आबालवृद्ध पारंपरिक वेषात या दिंडीत सहभागी झाले होते. या निमित्तानं अवघं वर्धा उत्साहात न्हाऊन निघालं होतं.