virat kohli anushka sharma: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनी मुंबईतील मढ आयलंड येथे स्कूटर चालवण्याचा आनंद घेतला. व्हिडिओमध्ये विराट स्कूटर चालवताना दिसत आहे तर अनुष्का त्याच्या मागे बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. आपल्या कामांमधून वेळ काढून या जोडीने मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.