Video : नितीन देसाई यांचा स्टुडिओ सरकार ताब्यात घेणार?; फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis on ND Studio : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विधानसभेत आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देसाई यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसंच, देसाई यांचा स्टुडिओ राज्य सरकारनं ताब्यात घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी यावर निवेदन केलं. 'नितीन देसाई हे खऱ्या अर्थानं मराठी माणसाला अभिमान वाटावं, असं व्यक्तिमत्व होतं. अनेक राजकीय पक्षांना सुद्धा मोठ्या आयोजनात ते मदत करायचे. या हरहुन्नरी कलाकाराचं आपल्यातून निघून जाणं हे वेदनादायी आहे. आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे. शिवाय त्यांना कुणी फसविण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा कुणी प्रयत्न करीत होते का, याचाही तपास करण्यात येईल. हा स्टुडिओ जतन करण्याबाबत कायदेशीर मत घेण्यात येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.