Asim Sarode Video : केजरीवालांच्या अटकेमागे वेगळंच कारण; असीम सरोदे यांनी सांगितलं!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Asim Sarode Video : केजरीवालांच्या अटकेमागे वेगळंच कारण; असीम सरोदे यांनी सांगितलं!

Asim Sarode Video : केजरीवालांच्या अटकेमागे वेगळंच कारण; असीम सरोदे यांनी सांगितलं!

May 13, 2024 05:55 PM IST

Asim Sarode Speech Video : महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नुकतंच भाषण केलं. सरोदे यांनी देशातील वास्तव मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी मोदी यांनी देशात दडपशाही चालवली आहे. मुख्यमंत्री पदावर असताना अरविंद केजरीवाल यांना अटक केली गेली, असं पहिल्यांदाच घडलं. केजरीवाल यांनी मद्य धोरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. मात्र, ते चूक आहे. केजरीवाल यांना वेगळ्याच कारणासाठी अटक झाली होती. त्यांच्याकडून मोदी सरकारला त्यांच्या कम्प्युटरचा कोडवर्ड हवा होता. केजरीवाल हे सनदी अधिकारी होते. भ्रष्टाचार कसा होतो याची त्यांना चांगली माहिती आहे. मोदी आणि शहा यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांच्याकडं आहेत. म्हणूनच त्यांना अटक केली गेली. अटक केल्यापासून पोलीस त्यांना पासवर्ड विचारत होते, असा दावाही सरोदे यांनी केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp