chhagan bhujbal video : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा नुकताच मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची उजळणी केली. दलित, मुस्लिम आणि आदिवासी मतदार आपल्याला का सोडून गेला, याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. या मतदारांना आपल्याकडं परत आणावं लागेल. त्यांच्यात विश्वास निर्माण करावा लागेल, असं छगन भुजबळ म्हणाले.