devendra fadnavis on bjp debacle : लोकसभा निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आमचे मुंबईचे अध्यक्ष व राज्याचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र काम केलं. कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याचं काम केलं. मात्र जागा कमी आल्या आहेत ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले. नेता म्हणून भाजपच्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे. आता राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी काम करायचं आहे. त्यासाठी पक्षानं मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळं करावं अशी विनंती मी करणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.