Rohit Pawar on Abhay Mandhare : महाराष्ट्रात बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील अजित पवार व रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अजित पवार गटाकडून सरळ सरळ गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यावर रोहित पवार यांच्यासोबत अभय मांढरे नावाच्या एका व्यक्तीचा फोटो अजित पवार गटानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिलं आहे. अभय मांढरे आणि अजित पवार यांचं नातं काय आहे ते त्यांनी जाहीरपणे सांगण्याची हिम्मत दाखवावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं अभय मांढरे हे नक्की कोण आहेत असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.