sonia gandhi raebareli speech : ‘आजवर तुम्ही मला आपलं मानलं. आपुलकीनं वागवलं, प्रेम दिलं. आज मी माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवत आहे. त्यालाही तेच प्रेम द्या. तो तुम्हाला निराश करणार नाही,’ असं भावनिक आवाहन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज रायबरेलीच्या जनतेला केलं. सोनिया गांधी यांच्या या भाषणामुळं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरच्या दिवसांत शिवतीर्थावर केलेल्या एका भाषणाची आठवण दिली. त्या भाषणातून बाळासाहेबांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं होतं. माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा असं ते म्हणाले होते.