Sharad Pawar on Prakash Ambedkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोला इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीच्या पुढील वाटचालीवर भाष्य केलं. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार का याविषयी त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची व्यक्तिगत चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली आहे. मात्र, व्यापक देशहिताच्या दृष्टीनं ते सोबत असावेत असं आमचं मत आहे. मात्र याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत सामूहिकरित्या होईल, असं पवार यांनी स्पष्ट केलं.