sharad pawar video : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी निकालांवर भाष्य केलं.बारामती हा जो मतदारसंघ आहे. त्या ठिकाणाशी माझं ६० वर्षांचं नातं आहे. मी तिथं असो किंवा नसो, तिथल्या लोकांची मानसिकता मला माहीत आहे. तिथले लोक योग्य निर्णय घेतील याची मला खात्री होती. त्यामुळं तिथं वेगळं काही होईल असं वाटलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.