chhagan bhujbal on manusmriti : शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे. राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईतील कार्यक्रमातून या प्रस्तावास जाहीर विरोध केला आहे. संविधान बदलाच्या प्रचाराला तोंड देताना आमच्या नाकीनऊ आले होते. आता पुन्हा हे मनुस्मृतीचं नवीन काढलं गेलं आहे. हे अजिबात कोणाला मान्य होणार नाही. चातुर्वण्य आम्हाला मान्य नाही. आम्ही ती जाळलेली आहे. महाराष्ट्रात अनेक संत आहेत. त्यांच्या विचारांची शिकवण मुलांना देता येईल, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले