Uddhav Thackeray Speech Video : बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५८ वा वर्धापन दिन. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा साजरा केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं. उद्धव यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी मोदींना बिन-शर्ट पाठिंबा दिला. तर, काहींनी भाजप विरोधात लढण्याचं नाटक करून पाठिंबा दिला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.