Uddhav Thackeray speech video : बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५८ वा वर्धापन दिन. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा साजरा केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं. लोकसभा निवडणुकीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. शिवसेना सगळ्यांना पुरून उरली आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर व एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवला.