Uddhav Thackeray Video : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आरोप करणाऱ्या भाजपला खडे बोल सुनावले. व्होट जिहाद म्हणजे काय हे भाजपनं आधी लहानपणी ‘ताजिया’च्या खालून गेलेल्या नरेंद्र मोदींना विचारावं, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात व जयंत पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.