Sunil Tatkare video : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा नुकताच मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. २००४ साली सर्वाधिक आमदार निवडून येऊनही अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही. त्यासाठी अनुभवाचं कारण दिलं जात आहे. मात्र, शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनाही ७ वर्षांचाच अनुभव होता. अजित पवारांनाही तितकाच होता, तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही. अनुभवाचा काही प्रश्न नव्हता. हे पद त्यांना द्यायचंच नव्हतं,' असा आरोप तटकरे यांनी केला.