Anil Parab Video : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महायुतीनं जाहीर केलेल्या मुंबईतील उमेदवारांबद्दल भाष्य केलं. शिंदे गटानं उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर व दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांवरही भाजपनं व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले होते. त्यांची जागा तुरुंगातच आहे, असं सोमय्या सांगत होते. हाच धागा पकडून अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला रवींद्र वायकर व यामिनी जाधव यांचा भ्रष्टाचार मान्य आहे का हे सांगावं, असं आव्हान परब यांनी केलं. तसंच, किरीट सोमय्या यांना वायकर आणि जाधव यांचे स्टार प्रचारक जाहीर करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.