uddhav thackeray video : लोकसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. 'मशालने आग लावली आहे. २०१९ ला भाजपला किती जागा मिळाल्या होत्या. ४१ की ४२. आता किती राहिल्या? आता कळेल असली कोण आहे आणि नकली कोण आहे? मला हे नकली संतान म्हणत होते. पण हे स्वत: त्यांच्या आईला मानायला तयार नाहीत. मला परमात्म्यानं पाठवलंय म्हणतात. मग नकली संतान कोण?, असा उद्धव ठाकरे यांनी केला. सामान्य जनतेनं सामान्य जनतेची ताकद दाखवून दिली आहे.