Uddhav Thackeray : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पुण्यातील खडकवासला इथं नुकतीच जाहीर सभा झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार यांना अस्वस्थ आत्मा म्हणणाऱ्या मोदींचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. नरेंद्र मोदी म्हणजे वखवखलेला आत्मा आहे. हा आत्मा फक्त स्वत:साठी लढतोय. मी, माझं, माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी... हे या आत्म्याचं धोरण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.