North West Mumbai Lok sabha election result : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला. इथं शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचा विजय झाला. मात्र या निकालाला ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. या विरोधात त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेऊन आमदार अनिल परब यांनी पक्षाची बाजू मांडली. या निवडणुकीत सर्व नियमांना हरताळ फासला गेला. अनेक चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या. तिथल्या निवडणूक अधिकारी स्वत: चुकीच्या गोष्टीत सहभागी झाल्या होत्या, असा आरोप अनिल परब यांनी केला. नेमकं काय आणि कसं झालं हे सगळं अनिल परब यांनी सांगितलं.