Sushma Andhare Speech Video : मुंबईतील बोरिवली इथं झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या खास शैलीत हल्ला चढवला. एकनाथ शिंदे हे बिच्चारे आहेत. त्यांच्या हातात काहीच नाही. देवेंद्र फडणवीस हे उठ म्हणतील तिथं उठायचं आणि बस म्हणतील तेव्हा बसायचं एवढंच ते करू शकतात. फडणवीस हे शिंदेंना बुडवणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे माहीत असूनही शिंदेंना काही करता येत नाही. कारण, काही केलं तर ईडीचा जांगडगुत्ता मागे लागेल, अशी भीती त्यांना आहे, असा टोला अंधारे यांनी हाणला. त्यांच्या भाषणाला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.