sharad pawar video : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी निकालांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात एक प्रकारची परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा निकाल इतर परिवर्तनाला पोषक असा निकाल आहे. देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं १० जागा लढवल्या होत्या. त्यात ७ जागांवर आम्हाला आघाडी आहे. याचा अर्थ आमचा स्ट्राइक रेट उत्तम आहे. हे केवळ आमचं यश नाही. महाविकास आघाडीचं यश आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही चांगलं यश मिळालं आहे. आम्ही यापुढंही एकत्रितपणे काम करू, असं शरद पवार यांनी सांगितलं.