Nilesh Lanke Speech Video : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिन अहिल्यानगर इथं सोमवारी पार पडला. यावेळी झालेल्या भव्य मेळाव्यात नवनिर्वाचित खासदार व पक्षाच्या नेत्यांची भाषणं झाली. अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणावर शरद पवारही खळखळून हसले. कुणाचाही नाद करा, पण शरद पवार यांचा नाद कुणी करायचा नाही. त्यांच्यापुढं भले-भले थकले आहेत. भल्याभल्यांना घरी जायला लागलंय,' असा इशारा नीलेश लंके यांनी यावेळी दिला.