मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शाळांमध्ये विशिष्ट धर्माच्या शिक्षणाचा आग्रह योग्य नाही - शरद पवार

Video : शाळांमध्ये विशिष्ट धर्माच्या शिक्षणाचा आग्रह योग्य नाही - शरद पवार

Jan 09, 2024 05:12 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 09, 2024 05:12 PM IST

Sharad Pawar said on religious education : महापालिका शाळा व अन्य सरकारी शिक्षण संस्थांमध्ये रामावर निबंध व वर्त्कृत्व स्पर्धा घेण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केलं. ‘माझ्याकडं काही शिक्षकांनी आजच तक्रार केली की मुंबईचे पालकमंत्री यात जास्त लक्ष घालतायत. पूर्ण शक्ती लावतायत. हे योग्य नाही. हा सेक्युलर देश आहे. सगळ्या धर्मांबद्दल आस्था राखणारे लोक इथं आहेत. आमच्याही मनात सर्व धर्मांबद्दल आस्था आहे. त्यामुळं नव्या पिढीच्या मुलांच्या मनावर ठरवून काही बिंबवण्याचं काम करणं हे योग्य नाही,’ असं पवार म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp