Ramdas Kadam Video : बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन १९ जून २०२४ रोजी पार पडला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मुंबईतील वरळी येथील एका सभागृहात हा सोहळा साजरा केला. रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी अनिल परब यांना 'बेडूक' आणि आदित्य ठाकरे यांना 'पेंग्विन' यांनी हिणवलं. उद्धव ठाकरे यांना सगळं आयतं मिळालेलं आहे. त्यांनी काहीच केलेलं नाही. मुंबई वाचवण्याचं काम मी केलंय, असं रामदास कदम म्हणाले. मुलासाठी माझं मंत्रिपद काढून घेतलं. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असं रामदास कदम यांनी ठणकावलं.