मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : जेवढे पैसे मोदींनी अदानी-अंबानींना दिले, तेवढे आम्ही गरिबांना देणार; काय म्हणाले राहुल गांधी?

Video : जेवढे पैसे मोदींनी अदानी-अंबानींना दिले, तेवढे आम्ही गरिबांना देणार; काय म्हणाले राहुल गांधी?

Apr 30, 2024 03:26 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 30, 2024 03:26 PM IST

Rahul Gandhi Speech Video : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसजसा पुढं सरकत आहे, तशी आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रत्येक सभेतून मोदी सरकारच्या कारभारावर तोफा डागत आहेत. अदानी व अंबानी यांच्याशी असलेल्या मोदींच्या कथित सलगीवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. अदानी अंबानी यांना कोट्यवधी रुपये दिले की देशाचा विकास होतो असं सांगितलं जातं, पण मनरेगामध्ये गरिबांना मजुरी दिली की म्हणतात काँग्रेस गरिबांना चुकीच्या सवयी लावते. म्हणजे उद्योगपतींना पैसे दिलेले चालतात, गरिबांना नाहीत. काँग्रेसला हे मान्य नाही. यापुढं जितके पैसे अदानी-अंबानींना मिळतील, तितकेच गरिबांना दिले जातील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे. मोदींचे अदानी, अंबानींसोबत फोटो आहेत. माझे फोटो कधी त्यांच्यासोबत पाहिलेत का? हा फरक आहे. मी तुमचा आहे, मोदी त्यांचे आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp