Narendra modi at Patna Sahib Gurudwara : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पाटणा साहिब गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. तसंच, तिथल्या लंगर सेवेतही सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी यांनी तिथं आलेल्या भाविकांना जेवण वाढलं. त्याआधी त्यांनी काही काळ गुरुद्वारातील स्वयंपाकघरात चपात्या लाटल्या. तिथं उपस्थित भाविकांना त्यांनी अभिवादनही केलं.