PM Modi Apology : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात पडल्यामुळं महाराष्ट्रासह देशात संतापाची लाट आहे. महाराष्ट्रातील भाजप प्रणित सरकारबरोबरच पुतळ्याचं उद्घाटन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडीनं १ सप्टेंबर रोजी मुंबईत निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी केवळ एक नाव नाही तर आराध्य दैवत आहे, असं ते यावेळी म्हणाले.