Pankaja Munde Video : लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघात पराभव झाल्यामुळं त्यांचे समर्थक व कार्यकर्ते निराश झाले आहेत. खचून गेले आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून संयमाचं आवाहन केलं आहे. तुम्ही निराश झाला तर मी पुढचा प्रवास कसा करू, असा भावनिक प्रश्न विचारून, पंकजा यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. जिवाचं काही बरंवाईट करून घेऊ नका. मी तुमच्यापर्यंत येईन, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.